1. सोमवार ते शनिवार या सहा दिवसांच्या प्रत्येक सकाळी स्वतःच्या "भविष्याची' आणि शरीरावर वाढणाऱया "चरबी'ची चिंता.
2. गावा-गावांत हाणामाऱया आणि घात-अपघात.
3. गल्ली-बोळात दहशतवाद.
4. फॅशन-शॉपिंगच्या टीप्स आणि अट्टल फिल्मी कार्यक्रम.
5. राजकारण्यांचा वाचाळपणा.
6. प्रत्येक रविवारी सकाळपासून पुढच्या आठवड्याच्या "भविष्याची' चिंता.
--------------------------------
चोविस तास बातम्या ओकणारी मराठी न्यूज चॅनेल्स बारकाईनं बघितली, तर हेच सहा विषय आलटून-पालटून फिरताना दिसतील...! दहा कोटी जनतेला फक्त सहा प्रश्नांनी वेढलंय. इतर प्रश्नांना "प्राईम व्हॅल्यू'च नाही....!
दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्यानंतरची गोष्ट. अनंतचतुर्दशीच्यादिवशी लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱया चॅनेल्सनी एकच सुर धरला होता, "बॉम्बस्फोटांची भीती आहे...पोलिसांना पक्की खबर आहे...चौका-चौकात पोलीस बंदोबस्त आहे...' इत्यादी इत्यादी.
दुपारपर्यंत पाहून क्षणभर असं वाटलं, की आता मिरवणूक बघायला जायचं की आपलं विसर्जन करायला...?
बॉम्बस्फोट झाले नाहीत, हे आपलं सुदैव आणि पोलिसांची कर्तव्यदक्षता. समजा झालेच असते, तर या चॅनल्सही, "आम्ही हे अगोदरच म्हटलं होतं...', असं सांगायलाही कमी केलं नसतं, हे नक्की !
No comments:
Post a Comment