Friday, October 31, 2008

राहुल 'राज'

राज ठाकरेंवर कारवाई महत्वाची की बिहारी उद्दामपणाला लगाम महत्वाचा, हा संभ्रम मराठी माध्यमांत गेल्या आठ दिवसांत दिसून येत आहे. राहुल राज या बिहारी तरूणाने बेस्ट बसमध्ये घातलेला धिंगाणा समर्थनीय होता का, त्याच्यावर गोळ्या चालविणारे पोलीस त्याला ठार मारायच्या उद्देशानेच कुर्ल्यातील बैलबाजारात पोहोचले होते का, त्यांनी नसत्या गोळ्या चालवल्या तर पुढं काय झालं असतं, हे अनुत्तरीत प्रश्न माध्यमांनी सोडवलेले नाहीत.

इंग्रजी आणि राष्ट्रीय मानल्या किंवा मानून घेणाऱया वृत्तवाहिन्यांनी तर मुंबई पोलिसांनी झोडपलेच आहे. राहुल राज हा अगदीच सामान्य तरूण होता, त्याला अकारणच ठार केले गेले, अशी टिका सुरूय.

आजतर त्याच्या बहिणीने नवाच आरोप केला. राहुलला पहिल्यांदा पोलिसांनी मारहाण केली आणि नंतर गोळ्या घातल्या...

No comments: