Monday, October 13, 2008

PROUD TO BE INDIAN...!

एक भन्नाट बातमी सगळीकडं सध्या पसरलीय. मेलमार्फत. भारताचे राष्ट्रगीत 'युनेस्को'ने सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून निवडले, अशी ही बातमी. 'देव-देश आणि धर्मा'साठी इंटरनेटचा हा आणखी एक वापर.

आपल्यापैकी अनेकांना हा मेल आला असेल. आपण वाचून सोडून दिला असेल किंवा फॉरवर्ड केला असेल. असले देशभक्तीपर मेल फॉरवर्ड केले, की आपला 'देशभक्ती कोशंट' वाढल्याचा फिल येत असावा बहुधा...!

तर हा मेल तद्दन भुरटा आणि बनावट आहे. तरीही त्याची 'बातमी' होऊ शकते...! छापून येते...!! लोक ती वाचतात आणि खरी मानतात...!!!

प्रिंट माध्यमांनी कशाला टीव्हीला नाकं मुरडायची आता? 'इंडिया टीव्ही' जग कधी बुडणार हे तारीख-वार सांगतो, म्हणून हसायची काहीच गरज नाही. त्यावरचढ बातमीसुद्धा छापून येऊ शकते !!

मेल होता तो असा-
Subject: Our National Anthem is Best in the World
PROUD TO BE AN "INDIAN"

UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization)
Announces INDIAN NATIONAL ANTHEM as the BEST National Anthem in the World.

India Best National Anthem
Please forward this to all the Indians.
PROUD TO BE INDIAN!...

-----------------------------------

खरे तर यासंदर्भात इंटरनेटवर सर्च केले, तर खरी माहिती मिळण्याची शक्यता आहे...!

हॉक्स-स्लायर या साईटवर माहिती आहे. (अशा स्वरुपाच्या इमेल्सबाबत माहिती घेण्यासाठी ही साईट बऱयापैकी उपयुक्त आहे.)

No comments: