Friday, October 3, 2008

पवारांचं मीडिया ज्ञान

-गुरुवारी पुण्यात पत्रकारांचं अधिवेशन झालं. 'श्रमिक' या कॅटॅगरीत मोडणाऱया पत्रकारांसाठीच्या या अधिवेशनात पत्रकारांना 'मार्गदर्शन' केलं, ते राजकीय नेत्यांनी. 'कल्टीमीडिया'ला सगळ्यात चांगला विषय मिळाला, तो इथं ! 'मीडियानं अमुक करावं...', 'रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालावं,' असल्या सूचनांना, सल्ल्यांचा पाऊस दिलीप वळसे पाटील, गोपिनाथ मुंडे आणि नारायण राणेंच्या भाषणातून पडला. त्यातल्या किती मनावर घ्यायच्या, हे 'श्रमिक' ठरवतीलच; पण, समजूनच घ्यावं लागेल असं भाषण होतं, ते शरद पवार यांचं.

मल्टीमीडिया किंवा आपलाच मीडिया वृत्तपत्रांना किंवा त्यांच्याशी संबंधित घटकांना खरंच किती कळतो की कळतच नाही, हे माहिती नाही. पवार यांना तो नक्की कळतो, हे या भाषणातून दिसलं.

इतर वक्ते जेव्हा टीव्ही आणि प्रिंटभोवती फिरत राहिले, तेव्हा पवार यांनी मोबाईल, इंटरनेटच्या चार गोष्टी केल्या. अधिकारवाणीनं सल्ला दिला. विनोदी गोष्ट म्हणजे, नेमका हाच सल्ला, गोष्टी बातम्यांमधून सुटल्या...! पवारांनी सांगितलं, की अमेरिकेत इंटरनेटवर मतदारांचा कौल ठरतोय...मोबाईलवर युरोपात सगळं होतंय...आपणही कदाचित त्या दिशेनं जात आहोत...त्याचा विचार केला पाहिजे...इत्यादी इत्यादी.

कुठल्याही अधिवेशनात संबंधित घटकांच्या वर्तमानावर आणि भविष्यावर विचारमंथन अपेक्षित असतं. हे तर पत्रकारांचं अधिवेशन. या घटकाच्या भविष्याची दिशा ठरणं अपेक्षित. ते मंथन पवारांना सुरू तर केलं. पण, पुढं गेलंच नाही. जे काम आपलं, ते पवार करून गेले...आपण केलंच नाही...!

तर याला म्हणतात कल्टी...!

इथं वाचा
- महाराष्ट्र टाईम्समधील बातमी
- सकाळ
- लोकसत्ता
- लोकमत

Wednesday, October 1, 2008

कल्टीमीडिया

तसे मीडियाचे बहोत प्रकार...जैसे की छापखाने, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, इंटरनेट (आंतरमहाजाल की काय ते), नभोवाणी...इत्यादी इत्यादी...तर त्या सर्वांनाच येकत्र आणतो, तो मल्टीमीडिया...

आणि म्हणून आमचा कल्टीमीडिया...!