Saturday, November 1, 2008

What is the TRUTH then?

न्यूज ऑथेन्टिसीटीचा मुद्दा आला, की आपल्याकडं 'बीबीसी'चं उदाहरण वरचेवर दिलं जातं. किमान जर्नालिझमच्या शिक्षणामध्ये तरी ! हे उदाहरण अनेकदा खोटंही पडतं. विशेषतः पाकिस्तानसंदर्भातील बातम्यांबाबत. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर भारतीय विरोधी नाऱयानंतर घडलेल्या एका घटनेतून 'बीबीसी'च्या बातमीदारीचा उत्तम पाहायला मिळाला.

बातमीकडे निःपक्षपातीपणे पाहणे, हा खरंतर बातमीदारीतला पहिला धडा. तो ठार झाला की काय, असं वाटणारी परिस्थिती सध्या . भावनेच्या अतिरेकात सत्य शोधायच्या आधीच बातमी प्रसिद्ध करून टाकण्याची प्रवृत्ती प्रादेशिक माध्यमांमध्येच नव्हे, तर एकूण भारतीय माध्यमांमध्ये बोकाळली आहे.

त्यामुळेच बीबीसीला एखाद्या घटनेतील प्राथमिक सत्य 29 ऑक्टोबरला कळू शकते आणि आयबीएन खबरला 30 ऑक्टोबरला...!

दोन्ही बातम्या जरूर वाचा-

Friday, October 31, 2008

राहुल 'राज'

राज ठाकरेंवर कारवाई महत्वाची की बिहारी उद्दामपणाला लगाम महत्वाचा, हा संभ्रम मराठी माध्यमांत गेल्या आठ दिवसांत दिसून येत आहे. राहुल राज या बिहारी तरूणाने बेस्ट बसमध्ये घातलेला धिंगाणा समर्थनीय होता का, त्याच्यावर गोळ्या चालविणारे पोलीस त्याला ठार मारायच्या उद्देशानेच कुर्ल्यातील बैलबाजारात पोहोचले होते का, त्यांनी नसत्या गोळ्या चालवल्या तर पुढं काय झालं असतं, हे अनुत्तरीत प्रश्न माध्यमांनी सोडवलेले नाहीत.

इंग्रजी आणि राष्ट्रीय मानल्या किंवा मानून घेणाऱया वृत्तवाहिन्यांनी तर मुंबई पोलिसांनी झोडपलेच आहे. राहुल राज हा अगदीच सामान्य तरूण होता, त्याला अकारणच ठार केले गेले, अशी टिका सुरूय.

आजतर त्याच्या बहिणीने नवाच आरोप केला. राहुलला पहिल्यांदा पोलिसांनी मारहाण केली आणि नंतर गोळ्या घातल्या...

Sunday, October 26, 2008

जो जे वांछिल...

शनिवारी नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. ही बातमी अनेक अर्थांनी महत्वाची. 'जिहादी' अतिरेक्यांना प्रत्युत्तर म्हणून तद्दन भंपक, देशाच्या एकतेला मारक मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीप्रमाणे वापरत आहे का, या मुळ प्रश्नाभोवती ही बातमी फिरणं खरंतर आवश्यक. मालेगाव बॉम्बस्फोटात संघाशी संबंधित लोक सामील होते का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि ते लोकांसमोर आणणं किती आवश्यक आहे, नाही शोधलं तर काय होऊ शकतं, याची झलक या बातमीतून दिसणं अपेक्षित होतं. 

प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या चार प्रमुख वृत्तपत्रांत कशी प्रसिद्ध झालीय ही बातमी? 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकमत' आणि 'सकाळ' या दैनिकांतील बातम्यांचा तपशील वाचला, तर हे सहज लक्षात येईल, की 'जो जे वांछिल...' अशीच बातमी आलीय...!

उदाहरणार्थ 'लोकसत्ता'मध्ये रोख रकमेची चोरी, काही नावं आहेत, जी इतरत्र नाहीत. 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये मुस्लिम तरुणांचा उल्लेख आहे. 'सकाळ'मध्ये तोंडाला फडके लावलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे आणि 'लोकमत'मध्ये यापैकी बराच तपशील नाहीच आहे...!

तर...असं एकूण आहे...

मुळ बातम्या वाचा:

Friday, October 24, 2008

"I'm sexually attracted to her..."

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर आपल्या प्रसार माध्यमांतील कॉलम् आणि 'बाईट्' धो धो भरून वाहात आहेत. 'सारा' नावाचं वादळ निवडणुकीचा आता केंद्रबिंदू झालंय. याचसंदर्भातील एक आर्टिकल न्यूयॉर्क टाईम्सच्या संडे मॅगझिनमध्ये प्रसिद्ध होतंय. राष्ट्राध्यक्ष निवडणूक डेमोक्रॅटस् आणि बराक ओबामा या वर्तुळात फिरत असताना रिपब्लिक पक्षाने 'सारा पालिन' नावाची 'हिरॉईन' कशी रिंगणात उतरविली, हे या आर्टिकलवरून समजतं. रॉबर्ट ड्रॅपर यांचं हे आर्टिकल विस्तृत आणि वाचनीय. त्यावर सुरू झालेली चर्चाही त्याच दर्जाची आहे.

जाता जाता...
आपल्या प्रिंट मीडियात एक (गैर)समज आहे. एखादं आर्टिकल लिहिलं, की ते पेपरात छापून येईल, तेव्हाच ते इतर माध्यमांनीही (उदा. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल इत्यादी इत्यादी) 'उचलावं'.  ही कधी कधी लेखकापासून ते येणारे लेख छापणाऱया संपादक प्रभुतींची इच्छा. न्यू यॉर्क टाईम्सचं संडे मॅगझिन नावाप्रमाणंच रविवारी प्रसिद्ध होतं! त्यातील, अशी चर्चा घडवून आणणारी आर्टिकल्स छापून येण्यापूर्वीच ऑनलाईन उपलब्ध असतात!

असो. 

आर्टिकल इथं वाचाः  The Making (and Remaking) of McCain

Wednesday, October 22, 2008

Cost to the company

जेट एअरवेजमधल्या नोकर कपात प्रकरणात खरंतर मीडियाचीच भूमिका निर्णायक होती. एरवी एखाद्या कंपनीतील पाच-पंचवीस कर्मचाऱयांना सहज काढून टाकले जाते. कोणी काही बोलत नाही. इथं काढून टाकलेल्यांचा आकडा मोठा होता आणि 24x7 चालणाऱया न्यूज चॅनेल्सना 'हॉट न्यूज' मिळाली होती. त्यामुळं नंतर जे काही घडलं, त्यात मीडियाने नरेंद्र गोयल आणि कंपनीवर आणलेला दबाब कारणीभूत नक्कीच होता.

आता यासंदर्भात आयबीएनच्या ब्लॉगवरची पोस्ट वाचनीय आहे. या सर्व प्रकरणातील आणखी एका पैलूवर ही पोस्ट प्रकाश टाकतेय...

पोस्ट इथं वाचा.

मराठीत रिपोर्टर्सना असं लोकांशी थेट बोलावंस वाटेल, तो सुदिन...!!!

Tuesday, October 21, 2008

Raj Arrest Drama...

एनडीटीव्ही